1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (22:51 IST)

शरद पवार म्हणाले, काँग्रेसला बाजूला करुन कोणताही पर्याय देणार नाही

Sharad Pawar said that he would not give any option to the Congressशरद पवार म्हणाले
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सिल्वर ओकवर भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. या भेटीवर बऱ्याच चर्चा सुरु होता. काँग्रेस व्यतिरिक्त वेगळा पर्याय देण्यासंदर्भात बैठका सुरु असल्याचं बोललं जात होतं. मात्र, शरद पवार यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेसला बाजूला करुन कोणताही पर्याय देणार नाही, असं स्पष्ट केलं.
ममता बॅनर्जी इथे येण्याच्या पाठीमागे साहजीकच बंगाल आणि महाराष्ट्राचं जुनं नातं आहे. दोन्हा राज्यांमध्ये बऱ्याच गोष्टी साम्य आहेत. त्यांना मला भेटायचं होतं, उद्धव ठाकरे यांना पण भेटायचं होतं. पण उद्धव ठाकरे रुग्णालयात आहेत त्यामुळे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे भेटले. माझे सहकारी बराच वेळ त्यांच्याशी चर्चा केली. सध्याची परिस्थिती, राष्ट्रीय सत्रावरच्या चर्चा केल्या. भाजपला राष्ट्रीय पातळीवर पर्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. काँग्रेसला बाजूला करुन कोणताही पर्याय देणार नाही. तसंच, कोण नेतृत्तव करेल हा दुसरा मुद्दा असं शरद पवार यांनी सांगितलं. तसंच, नेता रस्त्यावर राहिला तरच विजय होतो हे ममतांचं म्हणणं अगदी योग्य असल्याचं शरद पवार म्हणाले.