गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (15:45 IST)

शिवसेनेकडून ठाणेकरांची घोर फसवणूक : अभिजित पानसे

गेल्या १० वर्षामध्ये ठाण्यात शिवसेनेनं आपल्या वचननाम्याप्रमाणं ठाणेकरांचं एकही काम केलं नाही. इथल्या जनतेची फसवणूक केलीय, असा आरोप मनसे नेते अभिजित पानसे आणि अविनाश जाधव यांनी केलाय.
 
ते म्हणाले की, ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात अनेक लेखी आश्वासनं देऊन घरोघरी जाऊन छापील पत्रकं वाटली होती. मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता न करता ठाणेकरांची फसवणूक केली असा आरोप त्यांनी केला. मनसेच्या वतीने सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत जनजागरण मोर्चा काढणार असल्याचे ते म्हणाले.
 
महापालिका हद्दीत शिवसेनेच्या वतीने आरोग्य कवच योजना, धरण क्षेत्र, ३० एकरमध्ये सेंटर पार्क, धरण बांधकाम, क्लस्टर योजना, ५०० चौरस फूट कर माफ, जल वाहतूक सुविधा अशी अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र यातलं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही, असा आरोप मनसेतर्फे करण्यात आलाय.