1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 फेब्रुवारी 2020 (12:47 IST)

दोन अपत्ये असणार्‍यांनाच सवलत

Shiv Sena
शिवसेनेने लोकसंख्या नियंत्रणाबाबतचे एक खासगी विधेयक राज्यसभेत मांडले आहे. दोन अपत्ये असणार्‍यांनाच नोकरी आणि शिक्षणात सवलत द्यावी अशी तरतूद या विधेकात करण्यात आली आहे.
 
शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडले असून हे मंजूर झाल्यास देशातील कुटुंब नियोजन पद्धतीला शिस्त लागेल, असे म्हटले आहे.
 
ज्यांना दोनच अपत्ये आहेत, अशांना नोकरीची संधी द्यावी तसेच मुलांना क्षैक्षणिक सवलतींचा लाभ देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. या विधेयकानुसार ज्या दांपत्यास दोनपेक्षा अधिक मुलं असतील त्यांना शैक्षणिक सवलती मिळणार नाहीत. तसेच नोकरीची संधीही नाकारण्यात येईल.
 
देशाच्या विकासासाठी लोकसंख्या नियंत्रण अत्यंत महत्वाचे असून यासाठी प्रभावी कार्यक्रम राबवण्याची शिवसेनेची भूमिका आहे. लोकसंख्या नियंत्रणालासाठी कायदा आणण्याची आवश्यकता असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. 
 
विधेयक मांडल्यावर विविध पक्षांनी आपली मतं व्यक्त करत एमआयएम पक्षाने विरोध दर्शवला आहे.