मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 नोव्हेंबर 2019 (10:19 IST)

भाजपला राष्ट्रपती खिशातच आहे, असे वाटते काय शिवसेनेचा सवाल

राज्यात लवकर सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, अशी गर्भित धमकी देणाऱ्या भाजपला शिवसेनेने शिंगावर घेतले आहे. भाजपला राष्ट्रपती आपल्या खिशातच आहे, असे वाटते की काय, असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून उपस्थित करण्यात आला आहे.  
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत वेळ पडल्यास शिवसेना आवश्यक बहुमताची जुळवाजुळव करून सरकार स्थापन करू शकते, असा इशारा भाजपला दिला होता. त्यामुळे भाजपने दिलेला शब्द पाळावा. अन्यथा उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही पर्याय उरणार, असे राऊत यांनी म्हटले होते.