1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 जानेवारी 2022 (08:11 IST)

धक्कादायक: नाशिकला तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न, काका-पुतणीचा प्रतिकार

Shocking: Attempt to abduct a young woman in Nashik
रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीचे अपहरण करण्याचा धाडसी प्रयत्न पेठफाटा येथे उघडकीस आला.काका-पुतणीने प्रतिकार केल्याने संशयितांचा प्रयत्न फसला.याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित राम दगू सांगळे व रोहित एकनाथ मल्ले या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडितेच्या तक्रारीनुसार संशयित राम सांगळे, रोहित मल्ले हे दुचाकीने आले. दुचाकी पीडित युवतीच्या समोर उभी करत रस्ता अडवला. संशयित राम सांगळे याने तरुणीचा हात पकडून तिला दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तरुणीच्या काकांना समजला. त्यांनी घटनास्थळी येत प्रतिकार केला. गर्दी झाल्याने संशयितांनी तरुणीस शिवीगाळ करत पोलिसांत तक्रार दिली तर पाहून घेऊ, अशी धमकी देत फरार झाले. घटनेची माहिती मिळताच सहायक निरीक्षक सत्यवान पवार यांनी संशयितांचा शोध घेतला.