1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 डिसेंबर 2021 (18:30 IST)

धक्कादायक ! जंगलात आढळले तिघांचे मृतदेह

Shocking! The bodies of three were found in the forestधक्कादायक ! जंगलात आढळले तिघांचे मृतदेह  Maharashtra News Regional Marathi News
नांदेड जिल्ह्यातील टाकराळा तालुक्यातील हिमायत नगरच्या शिवारातील जंगलात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळल्याने नांदेड हादरलं आहे. या मृतदेहात  आई आणि मुलाचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत तर पिताचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर याच कुटुंबातील 18 वर्षाचा मुलगा अभिजित शांतामन कावळे बेपत्ता असल्याचे वृत्त मिळाले आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली असून घटना आठ दिवसांपूर्वीची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच मृतदेहांचे शवविच्छेदन करावे लागले. 
मयत शांतमन सोमाजी कावळे(45) यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला . तर त्यांच्या पत्नी आणि मुलाची दगडाने ठेचून त्यांच्या मृतदेह काही अंतरावर आढळून आला. टाकराळा तालुक्यातील हिमायत नगरच्या शिवारातील जंगलात तीन मृतदेहाची माहिती मिळतातच तामसा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेह कुजल्याने त्यांचे शवविच्छेदन तिथेच करण्यात आले. कुटुंबातील 18 वर्षीय मुलगा बेपत्ता असल्याची माहिती मिळाली असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.