1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जानेवारी 2020 (11:11 IST)

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

Siddhivinayak Temple closed for five days
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान गणरायाच्या मूर्तीला ‘शेंदूर लेपन’ करण्यात येणार असल्यानं सिद्धिविनायक मंदिराचा मुख्य
गाभारा बंद राहणार आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत भाविकांना बाप्पाचं दर्शन घेता येणार नाही.
 
माघी गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी अशा प्रकारचं शेंदूर लेपण श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीला केलं जात असतं. त्या दरम्यान गाभाऱ्यात असलेल्या मुख्य मूर्तीचं दर्शन बंद ठेवण्यात येते.
 
सिद्धिविनायक मंदिराचा मुख्य गाभारा 15 ते 19 जानेवारी दरम्यान बंद राहणार असला तरी ‘श्रीं’च्या प्रतिमूर्तीचे दर्शन भक्तांना घेता येईल. तसेच 20 जानेवारीला मूर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर भाविकांना प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेता येईल, अशी माहिती न्यासातर्फे देण्यात आली आहे.