Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

एसटी कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही संप सुरुच

pmp buses
मुंबई| Last Modified गुरूवार, 19 ऑक्टोबर 2017 (09:46 IST)
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात काल रात्री उशिरा बैठक झाली. मात्र या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी संप मागे घेतला नसून तो यापुढेही सुरुच राहणार असल्याचे सांगितले आहे.
संघटनेनं सातवा वेतन आयोग आणि सेवा ज्येष्ठतेनुसार वेतनवाढ करण्यासाठी साडे 4 हजार कोटींची मागणी प्रशासनाकडे केली होती. तर रावतेंनी 2.57 हजार कोटींचा प्रस्ताव एसटी कर्मचारी संघटनेपुढे ठेवला आहे. यापेक्षा अधिक रक्कम देली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


यावर अधिक वाचा :