1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (12:45 IST)

राज्यातील अनेक जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला, लालपरीची सेवा खंडित

ST workers went on strike in several districts of the state
राज्य परिवहन मंडळाचे राज्यसरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागण्या घेऊन राज्यातील काही जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या जिल्ह्यात पुणे, नागपूर, अमरावती, सांगली, जालना या जिल्ह्याचा समावेश आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती मध्यवर्ती बसस्थानक बंद आहे येथून केवळ मोजक्याच बस सेवा सुरु आहे. या व्यतिरिक्त अमरावती जिल्ह्यातील बडनेरा, परतवाडा, मोर्शी, वरुड आगार बंद ठेवण्यात आले आहे. अंबड मध्ये देखील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. सांगली मध्ये या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मिरज येथेही एसटी बस सेवा सुरळीतपणे सुरु आहे.तर  ग्रामीण भागात संपाचा असर दिसून येत आहे. पुण्यात देखील संपाचा परिणाम बघायला मिळत आहे. येथील नारायणगाव, राजगुरूनगर, इंदापूरमधील बसडेपो बंद ठरवण्यात आले आहे. तसेच पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर, भोर, बारामती बस डेपो बंद असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे.  ऐन दिवाळीच्या सणावर एसटी बस बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे की राज्य परिवहन महामंडळाचे राज्यसरकारमध्ये विलीनीकरण केले जावे. या मागणीला घेऊन एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.