नराधम बापाचे कृत्य अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. महिला बाहेर नाही तर घरात सुरक्षित नाही हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील मरकळ (ता. खेड) येथे एका नराधम सावत्र बापाने त्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 7 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी घडली असून, फिर्यादी महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आरोपी आणि फिर्यादी महिला हे एकाच कंपनीत गेल्या दोन वर्षांपासून दिवस आणि रात्रपाळीमध्ये काम करत होते. फिर्यादी महिलेचा आरोपीसोबत मंदिरात विवाह लावून देण्यात आला होता. रविवारी आरोपी रात्रपाळी करुन घरी परतला. त्यावेळी मुलीची आई दिवसपाळीमध्ये कामाला गेली होती. घरात पीडित मुलगी आणि सावत्र वडील दोघेच होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत सावत्र बापाने मुलीवर बळजबरी करत बलात्कार केला आहे. जेव्हा या मुलीची आई संध्याकाळी नोकरीवरून परत घरी आली तेव्हा पीडित मुलीने याबाबत तिला सर्व सांगितले. त्यानंतर आईने थेट आळंदी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली.

आरोपी हा मूळचा मध्यप्रदेशचा असून मुलीची आई अरुणाचल प्रदेश येथील आहे. आरोपीला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.


यावर अधिक वाचा :

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...

उद्धव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा : ...

उद्धव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा : फडणवीस
करोनामुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते आणि माजी ...

EMI टाळण्यासाठी फोन कॉल किंवा मेसेज आल्यास सावध राहा, ओटीपी ...

EMI टाळण्यासाठी फोन कॉल किंवा मेसेज आल्यास सावध राहा, ओटीपी शेअर करू नका
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे लॉकडाऊनची परिस्थितीला बघून रिझर्व्ह बँकेने बँकेच्या ...

लॉकडाउन उठेल असे कुणी गृहीत धरू नये : टोपे

लॉकडाउन उठेल असे कुणी गृहीत धरू नये  : टोपे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावरोखणसाठी राज्यात लागू केलेला लॉकडाउन 15 तारखेनंतर 100 टक्के ...

दोन वर्षांपूर्वी यामुळे विराट झाला शाकाहारी

दोन वर्षांपूर्वी यामुळे विराट झाला शाकाहारी
भारताचा कर्णधार विराट कोहली हा दोन वर्षांपासून शाकाहारी आहे, असे तुम्हाला सांगितले तर ...

WhatsApp ने घेतला मोठा निर्णय, मेसेज फॉरवर्ड करण्याला नवीन ...

WhatsApp ने घेतला मोठा निर्णय, मेसेज फॉरवर्ड करण्याला नवीन मर्यादा
करोना व्हायरसबाबत अफवा पसरू नये यासाठी लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ने मोठा ...