1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 मे 2021 (07:52 IST)

सोलापूरमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर

Strict lockdown
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 8 मे  रात्री 8 वाजल्यापासून 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान मेडिकलसह अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. महापालिका आयुक्त तसेच जिल्हा परिषद सीईओ यांच्या उपस्थितीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सोलापूरची रुग्णसंख्या वाढत असल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.