मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 मार्च 2022 (19:48 IST)

जिल्हा परिषद शाळेतील छताचे प्लॅस्टर कोसळून विद्यार्थी जखमी

तालुका जत येथील सोरडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील छताचे प्लास्टर कोसळून एक विद्यार्थी जखमी झाला. सुदैवाने त्याला मोठी इजा झाली नाही. आराध्य अरुण अभ्यागे वय वर्ष सात असे या विद्यार्थ्यांचे नाव असून हा इयत्ता पहिलीचा विद्यार्थी आहे. सध्या सोरडी येथे इयत्ता पहिली पासून इयत्ता सातवीचे वर्ग भरतात. 
इयत्ता पाहिलीत वर्ग सुरु असताना छतावरील स्लॅब सिलिंगचा काही भाग कोसळून बेंचवर बसलेल्या आराध्यच्या बेंचचा पुढील बाजूस पडल्याने तो थोडक्यात बचावला. या मध्ये तो किरकोळ जखमी झाला आहे. वर्गातील शिक्षकांनी प्रसंगावधान राखून विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर जाण्यास सांगितल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना सकाळी नऊ च्या सुमारास घडली. 

निकृष्ट बांधकामामुळे हा प्रकार घटल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पालकांनी या बांधकामाशी संबंधित ठेकेदार आणि शाखा अभियंता व अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहे.