शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 मे 2021 (16:02 IST)

कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपासंदर्भातचा पेच सोडवण्यात यश - जयंत पाटील

कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपासंदर्भातचा पेच सोडवण्यात यश आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिली. 
पिंपळगाव जोगे धरणाच्या लाभ क्षेत्रातील काही शेतकरी उच्च न्यायालयात गेले होते. त्यामुळे कुकडीच्या पाणी आवर्तनाला स्थगिती मिळाली होती. यासंबंधी शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी अबाधित राहील असे आश्वासित केलेलं आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले. 
कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपाचे फेरनियोजन करून सगळ्यांची काळजी कायमची मिटेल असा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगतानाच कुकडी प्रकल्प हा महाराष्ट्रातील जुना प्रकल्प आहे. आदरणीय शरद पवारसाहेबांच्या दूरदृष्टीने हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. परंतु आता ३० ते ४० वर्षांनंतर पाण्याच्या मागणीनुसार काही बदल करणे आवश्यक आहे. या कामासाठी या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभले. ही महाविकास आघाडी सरकारची महत्वाची उपलब्धी ठरेल असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.