सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जुलै 2019 (16:47 IST)

अमृता फडणवीस यांची यशस्वी मध्यस्थी, मुंबई पोलिसांनी पायलला केले अनब्लॉक

मुंबई पोलिसांनी आपल्याला ट्विटरवर ब्लॉक केल्याचं अभिनेत्री पायल रोहतगी पायलने सांगितलं होतं. या पोस्टमध्ये तिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना टॅगही केलं होतं. या पोस्टनंतर अमृता फडणवीस यांनी मध्यस्थी केली असून त्यांच्या सांगण्यावरुन मुंबई पोलिसांनी पायलला अनब्लॉक केलं आहे.
 
पायलने ट्विटरवर मुंबई पोलिसांनी ब्लॉक केल्याचा एक स्क्रीन शॉट शेअर केला होता. ही पोस्ट करत तिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना टॅग केलं होतं. सोबतच तिने अमित शहा यांना या संदर्भात इमेलही पाठविला होता. तिच्या या पोस्टची अमृता फडणवीस यांनी दखल घेत एक पोस्ट लिहिली त्यात त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग केलं होतं.
 
“एखादा नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून जर त्याचं मत व्यक्त करत असेल, (..आणि ज्याने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जात नसतील) तर अशा नागरिकाला सार्वजनिक संस्थेने ब्लॉक करणे योग्य नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकरणी लक्ष द्यावे”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.