testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राष्ट्रवादीच्या यांच्या राज्य दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात

sunil tatkare
Last Modified शुक्रवार, 14 जुलै 2017 (07:44 IST)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या राज्य दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात आज जळगाव येथून झाली.

यावेळी बोलताना माजी विधान सभा अध्यक्ष अरूण गुजराथी म्हणाले की कर्जमाफीसाठी योग्य वेळ कोणती हे सरकारला संघर्ष यात्रा आणि शरद पवार पंतप्रधान मोदींना निवेदन केल्यानंतर समजले. माझ्या २७ वर्षाच्या राजकारणात काळ्या फिती घालणारे, विधिमंडळात आंदोलन करणारे मंत्री पाहिले नाहीत, अशी टीकाही त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर केली. तसेच, माजी विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटीलयांनी जी काही लाट, वारा होता तो आता ओसरला आहे. आपल्याला यापुढे संघर्षाची भूमिका ठेवूनच काम करायचे आहे, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाचित्रा वाघ

यांनी कोपर्डी येथील घटनेला आज वर्ष होऊनही अद्याप या प्रकरणी न्याय होऊ शकला नाही याबाबत खंत व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी लढा द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या मेळाव्यात युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम पाटीलपाटील, युवती प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील, सामाजिक न्याय विभाग राज्यप्रमुख आमदार अॅड. जयदेव गायकवाड, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे , जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश अण्णा पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार राजीव देशमुख, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे, माजी आमदार रवींद्र पाटील, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव तसेच इतर स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.यावर अधिक वाचा :