1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (15:30 IST)

फडणवीस यांनी केलेल्या तीन मागण्या अत्यंत महत्त्वाच्या, कारवाई करा

Take action
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या तीन मागण्या अत्यंत महत्त्वाच्या असून आपण यथोचित कार्यवाही करून मला माहिती द्यावी असे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी २३ जून रोजी राज्यपालांची भेट घेऊन दोन निवेदने दिली होती.  यामध्ये विधिमंडळ अधिवेशन कालवधी वाढवणे, विधानसभा अध्यक्षांचे अध्यक्षपद तातडीने भरणे आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने सद्यस्थितीत निवडणूक न घेण्याबाबतचा समावेश होता. या मागण्या महत्त्वाच्या असल्याचे नमूद करत राज्यपालांनी आता मुख्यमंत्र्यांना पठ पाठवून कार्यवाही करून माहिती देण्यास सांगितले आहे.