तलाठी भरती 2023 : तलाठी परीक्षेत कॉपी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलं
अलीकडेच राज्यात तलाठी भरती परीक्षा झाली. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली आहे. परीक्षापूर्वी पेपर फुटल्याचं उघडकीस आले आहे. या प्रकरणी नाशिकच्या एका परीक्षा केंद्राच्या बाहेर संशयास्पद व्यक्ती आढळून आला असून पोलिसांना त्याच्याकडून वॉकीटॉकी, दोन मोबाईल, स्पाय हेडफोन, टॅब आढळून आले असून ही व्यक्ती परीक्षा केंद्राच्या बाहेरून विद्यार्थ्यांना मदत करावीत असल्याचा संशय आहे. गणेश श्यामसिंग गुसिंगे असे या संशयित व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच महाराष्ट्रात तलाठी भरती 2023 या पदासाठी ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्राच्या विविध केंद्रावर घेण्यात आली. नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिंडोरी रोडच्या एका परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा सुरु असताना परीक्षा केंद्राच्या बाहेर एक व्यक्ती फेऱ्या मारताना दिसला.पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता त्याने बनावटीचे आणि संशयास्पद उत्तर दिल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्या कडून आधुनिक साहित्य, मोबाईल, टॅब, स्पाय हेडफोन, आणि परीक्षेच्या प्रश्नांचे फोटो आढळले. पोलिसांनी सदर व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याच्या अन्य साथीदारांचा शोधात आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Edited by - Priya Dixit