बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 ऑगस्ट 2019 (10:05 IST)

मुंबईचे वातावरण तापले : पोलिसांनी पाठवल्या मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोटीस

राज ठाकरे ई डी चौकशीला जाणार आहेत. त्यामुळे मनसे सैनिक संतप्त झाले आहेत. आगोदर बंद चे आवाहन केले होते, मात्र राज यांनी ते मागे घ्यायला लावले आणि मनसे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. मात्र पोलीस देखील त्यांचे काम करत आहेत.
 
कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या अंमलबाजवणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी होणार असल्याने दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात जेथे ईडीचे कार्यालय आहे तेथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न रहाण्यासाठी मुंबई पोलिसांनी फौ. द. प्र. स. कलम १४९ अन्वये नोटीस दिल्या आहेत. नोटिसी नुसार जर आज  कोणत्याही कृत्याने कायदा,  सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास संबंधित व्यक्तीस जबाबदार धरून आपणाविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असे नमूद केले आहे. यामध्ये पोलिसांनी पालघर येथील सक्रिय मनसैनिक तुलसी जोशी, दादर येथील मनसे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार, रिटा गुप्ता, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना नोटीस पाठवल्या आहेत.