रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 मे 2022 (10:10 IST)

कार झाडावर आदळून अपघातात तिघांचा मृत्यू

accident
जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील पळासखेडा जवळ भरधाव वेगाने जाणारी कार समोर येणाऱ्या गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात झाडावर आदळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी दुपारी घडली आहे. 
 
माहितीनुसार, पळासखेडा येथून चारचाकीने तिघे जण तारवड़े गावाकडे निघाले असता. त्यांची कार वेगात होती. रस्त्यावर समोरून येणाऱ्या गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे त्यांना अंदाज आला नाही आणि त्यांची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली आणि या अपघातात तिघांच्या डोक्याला आणि हातापायाला जबर मार लागला.त्यांना तातडीने स्थानिकांनी रुग्णालयात नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. किसान लखीचंद जाधव(40) पवन जिंदाल राठोड (26) आणि जितेंद्र काशिनाथ पवार असे या मृतकांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.