1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (16:18 IST)

शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत आढावा मुख्यमंत्री निर्णय घेतील

The Chief Minister will take a decision on starting schools and colleges
राज्यात शाळा, महाविदयालये सुरु होणार का याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी भाष्य केले आहे. राज्यात लवकरच शाळा, महाविद्यालय सुरु करण्याबाबत भूमिका घेण्यात येईल. ऑक्टोबर महिन्यात काय परिस्थिती आहे, ते पाहून पुढचे पाऊल, उचलण्यात येईल, असे अजित पवार यांनी आज स्पष्ट केले.
 
राज्यात दिवाळीनंतर शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच आढावा घेऊन अंतिम निर्णय होईल अशी माहिती अजित पवार यांनी  दिली.  कोरोनाची परिस्थिती काय आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत काय परिस्थिती असेल ते बघायचे. त्यानंतर कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेता येऊ शकतो का, यावर चर्चा होईल, असे ते म्हणाले.
 
तसेच शाळांबाबत लहान मुलांच्या लसी आल्या की त्यांचे लसीकरण करायचे आणि दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याची आमची मानसिकता आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. अंतिम निर्णय हा शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. त्यानंतर निर्णय होईल, असे ते म्हणाले.