शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (20:52 IST)

सराईत गुन्हेगार टिंग्या ऊर्फ भाईजी अखेर गजाआड!

jail
अहमदनगर शहरात दहशत पसरविणारा व खूनाचा प्रयत्न गुन्ह्यात पसार असलेला सराईत गुन्हेगार टिंग्या ऊर्फ भाईजी ऊर्फ सुमेध किशोर साळवे (वय 25 रा. निलक्रांती चौक, नगर) याला राजणगाव (जि. पुणे) येथून अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले.
 
आरोपी टिंग्याने पाच महिन्यापूर्वी एकाचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून टिंग्या पसार झाला होता. तोफखाना पोलीस शोध घेत होते. तो राजणगाव (जि. पुणे) येथे असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने राजणगाव येथे जावुन आरोपी टिंग्याला ताब्यात घेत अटक केली आहे. गुन्हेगार टिंग्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात मारहाण, सरकारी कामात अडथळा, खूनाचा प्रयत्न, आर्म अ‍ॅक्ट आदी कलमान्वये 11 गुन्हे दाखल आहेत.