पूरग्रस्ताना सरकारकडून अर्थसहाय्य, पैसे रोख स्वरूपात देणार

Last Modified सोमवार, 12 ऑगस्ट 2019 (10:09 IST)
पूरपरिस्थितीचा फटका अनेक कुटुंबांना बसला आहे. या कुटुंबांना शासनाकडून तातडीने अर्थसहाय्य दिले जाणार आहे. त्यात प्रत्येक कुटुंबला पाच हजार रुपये रोख मंगळवारपासून रोख स्वरूपात देण्यास सुरुवात होणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात पूरपरिस्थिती संदर्भातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

म्हैसेकर म्हणाले, नागरिकांची सोय होण्यासाठी पाच हजार रुपये हे रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर उर्वरित रक्कम ही त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. सांगली, कोल्हापूरत चलन तुटवडा निर्माण होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. कोणत्याही खातेदाराला पैसे काढण्यास अडचण निर्माण होणार नाही. बँकेने पासबुक अथवा चेकचा आग्रह धरू नये यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.
पैसे वाटपात पोलीस मदत लागली तर ती पुरवली जाईल. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांचे व्यवहार हे जिल्हा बँकेत आहेत. त्यासाठी एसबीआय बँकेने जिल्हा बँकेला पैसे उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना केल्या आहेत. तर पाणी कमी झाल्यानंतर कोल्हापूरला जाणाऱ्या रस्त्यावरून पुढील काही दिवस केवळ अत्यावश्यक वस्तुपुरवठा करण्यासाठी महामार्गाचा वापर केला जाणार आहे. यामध्ये गॅस, पेट्रोल, डिझेल, औषधे यासाठी ही वाहतूक असेल. त्यामुळं सर्वसामान्य वाहन धारकांनी या मार्गावर प्रवास करण्याचा हट्ट धरू नये असे आवाहन देखील डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी उद्या जाहीर होणार

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी उद्या जाहीर होणार
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी 24 फेब्रुवारीला जाहीर झाली ...

अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून टोला

अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून टोला
मुंबईतील आझाद मैदानातील सभेत बोलताना वारिस पठाण यांच्या विधानावरून माजी मुख्यमंत्री ...

भगवानगडावरुन बाबांची रायफल आणि तलवारीची चोरी

भगवानगडावरुन बाबांची रायफल आणि तलवारीची चोरी
अहमदनगरच्या अहमदनगर तालुक्यातील भगवानबाबा गडावर चोरी झाली आहे. भगवानगडावरुन बाबांची रायफल ...

पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांची माहिती द्या ५ हजार मिळवा

पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांची माहिती द्या ५ हजार मिळवा
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण ...

रुग्णांना नारळ पाण्यात दारू!

रुग्णांना नारळ पाण्यात दारू!
नागपूर : कोणताही आजरा असो, उन्हाळा असो वा हिवाळा असो, नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. ...