1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 17 एप्रिल 2022 (13:47 IST)

गुजरातमध्ये झालेल्या लग्नात वराला मिळाली विचित्र भेटवस्तू

The groom received a strange gift at a wedding in Gujarat Lemon Gift In Wedding News Gujrat News Rajkoat News In Webdunia Marathi गुजरातमध्ये झालेल्या लग्नात वराला मिळाली विचित्र भेटवस्तू
सहसा, लग्नाच्या वेळी, वधू आणि वरांना अशी भेट दिली जाते, जी भविष्यात त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. नाहीतर अशी काही भेटवस्तू दिली जाते, जी वाईट काळात त्यांची गरज पूर्ण करू शकते, पण गुजरातमधील एका लग्नात काळाच्या गरजेनुसार योग्य भेट देण्यात आली आहे. 
 
राजकोटमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे.या ठिकाणी लग्नात वराला भेटवस्तू म्हणून  लिंबू दिले आहे. वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर वराला लिंबू भेट देण्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. 
 
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, हे प्रकरण राजकोटच्या धोराजी शहरातील आहे. येथे लग्नासाठी आलेल्या सर्वांनी वराला लिंबू भेट म्हणून दिले. 
 
सध्या राज्यात आणि देशात लिंबाचे भाव वाढले आहेत. या उन्हाळ्यात लिंबाची खूप गरज असते. म्हणूनच मी लिंबू भेट म्हणून  दिले आहे. असं लग्नात आलेल्या दिनेश नावाच्या व्यक्तींने सांगितले.  
 
या अनोख्या भेटीचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये काही लिंबू दोन पॅकेटमध्ये दाखवून लोक वराला भेटवस्तू देत आहेत. 
 
वाढत्या तापमान आणि लिंबाच्या वाढत्या मागणी मुळे लिंबूचे भाव गगनाला भिडत आहे. दरम्यान, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्या धक्कादायक आहेत. अनेक ठिकाणाहून लिंबू चोरीची प्रकरणे समोर आली आहेत, तर सोशल मीडियावरही लिंबाबाबतचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. महागाईमुळे लोक लिंबू खरेदी करणे टाळू लागले आहेत.