1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 एप्रिल 2022 (10:39 IST)

क्रेनचा गियर बॉक्स तुटल्याने अपघातात पती पत्नी ठार

The husband and wife were killed in an accident when the gear box of the crane broke क्रेनचा गियर बॉक्स तुटल्याने अपघातात पती पत्नी ठार
कोपरगाव शहरातील मूर्षतपूर शिवारात विहिरीचे खोदकाम करताना क्रेनचा गिअरबॉक्स तुटल्याने मोठा अपघात झाला आणि या अपघातात दोन जण ठार झाले. 
 
या अपघातात राजस्थान येथील जेठालाल जग्गूलाल भिल आणि त्यांची पत्नी शांती जेठालाल भिल ह्याचा दुर्देवी अंत झाला. कोपरगावात मूर्षतपूर  येथे विहिरीचे खोदकाम सुरु होते. या कामात लागलेय क्रेनचा गिअर बॉक्स तुटल्याने मोठा अपघात झाला आणि त्यात दोघे ठार झाले. जेठालाल भिल आणि शांती जेठालाल भिल असे या मयताची नावे असून ते पती-पत्नी होते. हे भिल दाम्पत्य राजस्थानचे रहिवासी होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.