बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 4 फेब्रुवारी 2024 (14:21 IST)

राज्यातील या भागात लागणार पावसाची हजेरी

हवामान खात्यानं उत्त्तरेत थंड हवेचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आठवड्याच्या शेवटी पावसाची हजेरी लागणार आहे. या मुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

राज्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे कोरडे हवामान दिसून येत आहे. महाराष्ट्रातील काही भागात येत्या 24 तासांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून थंडीचा जोर वाढणार आहे. 
 
राज्यातील  अकोला, चंद्रपूर, वर्धा, वाशीम, गडचिरोली, अमरावती या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि उत्तरेकडे थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे पुढील आठवड्यात हवामान कोरडे राहील. थंडीचा जोर वाढणार आहे.  सध्या वाऱ्यांची नैऋत्य राजस्थान आणि लगतच्या पाकिस्तानवर आहे याचा प्रभाव राज्यातील हवामानावर पडण्याची शक्यता आहे. हवामान कोरडे राहील . उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे राज्यात सोमवार 5 फेब्रुवारी पासून तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. किमान तापमानात सुमारे चार अंशाने घट होण्याची शक्यता असून आकाश निरभ्र राहील तसेच हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण आठवडा अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. 
 
Edited By- Priya Dixit