शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (08:02 IST)

बॅाश कंपनीचा धक्कादायक निर्णय; एकाच वेळी ७३० ओजीटी कामगारांना दिला ब्रेक

The shocking decision of the Bash company; Break given to 730 OGT workers at the same time Maharashtra News Regional Marathi News Webdunai Marathi
नाशिक येथे  बॅाश कंपनीतील सुमारे ७३० ओजीटी कामगारांना  ब्रेक दिला. त्यामुळे कामगारांध्ये खळबळ निर्माण झाली आहे. याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिली नसली तरी या कामगारांनी थेट कामगार उपायुक्त कार्यालयात निवेदन दिल्यामुळे ही बाब समोर आली आहे. 

कोरोना काळात सर्वच ठिकाणी कामगार व पगार कपात होत असतांना बॅाश कंपनीने पगारवाढ करुन सर्वांना धक्का दिला होता. पण, त्यानंतर दुस-याच महिन्यात कंपनीने सुमारे साडेपाचशे कामगारांना व्हिआरएस दिले. त्यानंतर आता ही मोठी कामगार कपात केली आहे. आता कमी केलेले कामगार हे कायमस्वरुपी नसले तरी ते गेल्या काही वर्षापासून कंपनीत काम करत होते.आज त्यांना पहिल्याच शिप्टपासून ब्रेक देण्यात आला. त्यामुळे सकाळी साडेअकरा वाजेला सर्व ओजीटी कामगार ईएसआयसी ग्राउंडवर एकत्र आले. त्यानंतर त्यांनी चर्चा केली व त्यानंतर त्यांनी कामगार उपायुक्त कार्यालयावर जाऊन निवेदन दिले.कामगारांना कमी करुन शिका आणि कमवा या योजनेचे कामगार भरती करण्यावर कंपनीचा आता भर असणार असल्याचे बोलले जात आहे. या कामगारांना ईएसआयसी. पीएफ सह इतर सुविधा लागु असणार नाही. केवळ आठ ते दहा हजार रूपये टायपेन देवून तीन शिप्ट मध्ये या कामगारांकडून उत्पादन केले जाणार असल्याचीही चर्चा आहे.