मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (17:28 IST)

राज्य या महिन्यापासून संपूर्णपणे अनलॉक होणार

कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. तिसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे राज्यात मार्चनंतरच शंभर टक्के अनलॉक होण्याची शक्यता आहे.दररोज शेकडो रूग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे राज्याच्या टास्क फोर्सनं सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे मास्क मुक्तीचा निर्णयही मार्चनंतरच होणार आहे. कोरोना निर्बंधात शिथिलता आणण्याच्या सूचना
 
राज्यांना केंद्र सरकारने केल्या आहेत. त्यानुसार हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. दरम्यान, लवकरच कोरोनाच्या निर्बंधातून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे.
 
रुग्णसंख्या कमी होत असल्याने केंद्राकडून राज्यांना निर्बंध शिथिल करण्याच्या सूचना केल्या आहेत.जवळपास गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाने देशातील नागरिकांना हैराण केले आहे. दरम्यान सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे.
 
राज्य कोरोनावरील कडक निर्बंधाबाबत पुर्नविचार करु शकता आणि अनावश्यक निर्बंध दूर करुन दिलासा देऊ शकतात, याबाबतचे पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या सचिवांना लिहिले आहे.
 
त्यानुसार राज्य सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मात्र टास्क फोर्सने सावध पवित्रा घेताना सध्या काही प्रमाणात रुग्णवाढ होत असल्याने मार्च 2022 नंतर अनलॉक होणार आहे.