शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (14:05 IST)

जालन्यात जांबेतील राम मंदिरातून ऐतिहासिक श्रीरामाच्या मूर्तीची चोरी

As many as 450 years old historical and rare idols of Rama
समर्थ रामदास स्वामी यांच्या जन्मगावी जांब येथील राम मंदिरातून तब्बल 450 वर्षीच्या जुन्या राम, लक्ष्मण आणि सीतेच्या ऐतिहासिक आणि दुर्मिळ मुर्त्या चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरटयांनी समर्थ रामदासांनी स्थापित केलेल्या राम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती चोरी केली आहे. तसेच ऐतिहासिक पंचायतन देखील चोरीला गेले आहे. घटनेची माहिती मिळतातच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पाळत ठेवून रात्री 3 च्या सुमारास हे चोरी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
या घटनेमुळे राज्यात जनक्षोभ उसळत आहे. समर्थ रामदास स्वामींच्या जन्मगावी जांब समर्थ राम मंदिरात महाराष्ट्रभरातून भाविक दर्शनाला येतात तसेच राज्यसरकारने या स्थळाला ब दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. 

चोरट्यांचा लवकरात लवकर शोध लावून या ऐतिहासिक आणि दुर्मिळ मुर्त्या परत मिळवाव्या आणि त्यांची सन्मानाने प्राण प्रतिष्ठा करावी अशी मागणी भाविकांकडून होत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.