मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (10:06 IST)

स्लॅब कोसळून 2 कामगारांचा दुर्देवी अंत

The unfortunate end of 2 workers collapsing the slab Maharashtra News Regional News In Marathi Webdunia Marathi
वाडा तालुक्यातील तानसा फार्म(मेट)या गावाच्या हद्दीत पेलटेकहेल्थ नावाच्या एका औषधी कंपनीत स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीररित्या जखमी झाले.जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,स्लॅब भरताना ही घटना घडली.ही कंपनी औषधे बनवते.कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकाकांनी केला आहे.या अपघातात दगावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई कंपनीने द्यावी,अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे नेते जितेश पाटील यांनी केली आहे.