गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 मे 2022 (14:18 IST)

बाप लेकाचा विहिरीत बुडून दुर्देवी अंत

The unfortunate end of father -son drowning in a well बाप लेकाचा विहिरीत बुडून दुर्देवी अंत
बीडच्या परळी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. वडील विहिरीत पडल्यावर त्यांना वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेणाऱ्या मुलाचा आणि पित्याचा विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्देवी अंत झाला आहे. सादिक शेख (58)आणि रफिक शेख(25) असे मयत पिता आणि पुत्राचे नाव आहे. ही घटना संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली.
 
बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात दादाहरी वडगाव येथे वडील आणि मुलगा नातेवाईकांसोबत दादाहरी वडगाव येथे फिरायला गेले असता विहिरीतून पाणी काढताना वडिलांचा पाय घसरला आणि ते विहिरीत पडले. त्यांना वाचविण्यासाठी मुलाने देखील विहिरीत उडी घेतली आणि त्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळतातच  सादिक यांच्या दुसऱ्या मुलाने साजिद ने देखील विहिरीत उडी मारली पण तो त्या दोघांना वाचवू शकला नाही. तो देखील पाण्यात बुडत असताना पाहून प्रसंगावधान राखून त्याच्या आईने मग विहिरीत दोर सोडून त्याला वर काढले. घटनेची माहिती मिळतातच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशिरापर्यंत मृतदेह काढण्याचं काम सुरु होत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.