1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 जून 2021 (16:45 IST)

तिसरी आघाडी भाजपला आव्हान देऊ शकत नाही-प्रशांत किशोर

Third front cannot challenge BJP: Prashant Kishor marathi regional news in webdunia marathi
"तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला आव्हान देण्यात यशस्वी ठरेल असं विश्वासाने सांगू शकत नाही," असं प्रशांत किशोर म्हणाले. तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीबाबत आपल्याला विश्वास नाही. तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देऊ शकेल यावरही आपला विश्वास नाही, असं किशोर यांनी सांगितलं.

प्रशांत किशोर यांनी आठवडाभराच्या कालावधीत सोमवारी दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रीय पातळीवर भाजप आणि काँग्रेस सोडून तिसरी आघाडी बनण्याच्या चर्चांना उधाण आलं. यापूर्वी किशोर यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती.

लोकसभा निवडणुकांना अजून 3 वर्षांचा कालावधी आहे. पण सत्ताधारी भाजपविरोधात तिसरी आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची दिल्लीत चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भेट घेतली. यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे.
 
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची समोवारी दिल्लीत झालेली बैठक ही आगामी लोकसभा निवडणूक 2024 डोळ्यासमोर ठेवून झाल्याचं बोललं जातंय.
 
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांनी 'मिशन 2024' सुरू केल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर झाली.