शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 जुलै 2021 (23:09 IST)

ही तर राज्याचे प्रश्न कोमात, स्वबळाची छमछम जोरात अशी परिस्थिती : शेलार

This is a state of affairs
राज्याचे प्रश्न कोमात, स्वबळाची छमछम जोरात, असे राज्याच्या परिस्थितीचे वर्णन करता येईल. आघाडीचा कोणताही नेता सकाळी उठतो आणि स्वबळाची भाषा बोलतो. दुसरा त्यावर अग्रलेख लिहतो आणि तिसरा दिल्लीत जातो. प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी प्रत्येक नेता १०८ वेळा स्वबळाचा मंत्र जपतात, अशी टीका भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केली.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी  प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 
 
शेलार म्हणाले, ‘‘सध्याची स्थिती आणि त्यावर मार्ग काढणे याचे प्रमाण व्यस्त आहे. राज्याचे प्रश्न कोमात असून, स्वबळाची छमछम मात्र जोरात आहे. महाविकास आघाडीचे सरकार टिकणार की नाही? याच्याशी आमचा संबंध नाही. ते जनता ठरविणार आहे. मात्र, जनतेच्या प्रश्नांवर सरकार बेफिकीर आहे. पोलिसांकडून तर केवळ वसुलीचे काम केले जात आहे. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे.’’