1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2022 (20:47 IST)

राज्यात मंदौस चक्रीवादळाचा असा होणार परिणाम

Cyclone Mandaus in the state
मंदौस चक्रीवादळ विरळले असून वेल्लोर जवळ तीव्र दाब क्षेत्रात रूपांतरित झाले आहे. मध्यरात्रीत ते केवळ कमी दाब क्षेत्रात (पहिल्या पायरीत) उतरेल. शिवाय ९० अंशीय कोनातून वळून ते नैऋत्येकडे झुकले असेल. त्यामुळे महाराष्ट्रावर वातावरणाचा आघात कमी जाणवेल.
 
विदर्भ वगळता मुंबईसह कोकणातील ४ व मध्य महाराष्ट्रातील १० (खान्देश, नाशिक ते सांगली सोलापूर पर्यन्तच्या) अशा १४ जिल्ह्यात दि.१२, १३ (सोमवार, मंगळवार) असे २ दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवते. मराठवाड्यात उद्यापासूनच ३ दिवस अश्या पावसाची शक्यता जाणवते. विदर्भात आजपासून पुढील ४ दिवस ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
 
परवा, १४ डिसेंबर अंदमानात पुन्हा चक्रीय वारे स्थिती निर्माण होत आहे. तर काश्मीर, हिमाचल मध्ये पाऊस व बर्फ पडणार आहे. या दोघात महाराष्ट्रातील वातावरणाचे सँडविच होणार आहे. बघू या पुढील ४-५ दिवसात महाराष्ट्रात काय वातावरणीय बदल होतात ते बघण्यासारखे आहे.
 
Edited by- Ratnadeep Ranshoor