1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जानेवारी 2022 (13:38 IST)

पंचगंगा नदीत हजारो मासे पाण्यावर तरंगत आहे, नागरिक चक्रावले

Thousands of fish are floating in the Panchganga river of Kolhapur
कोल्हापूरची जीवनदायीनी पंचगंगा नदी नेहमीच प्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेचा विषय ठरते. तर आज पंचगंगा नदीत वेगळंच चित्र पाहायला मिळाले. हजारो मासे जणू परेड प्रमाणेच नदीच्या पाण्याच्या पृष्ठभागावर दिसून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात नदीत मासे पाहून अनेकजण चक्रावले. अनेकांनी याचा व्हिडीओ देखील काढला आहे. माशांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 
यापूर्वी कधी फेसळालेले पाणी तर कधी मृत माशांचा खच लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र हा व्हिडीओ सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. यामागे नेमकं कारण स्पष्ट झाले नसले तरी हा प्रदूषणाचा परिणाम आहे का अशी भीती व्यक्त केली जात आहे. कारण प्रदुषणामुळे नदीच्या पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे ऑक्‍सिजन मिळवण्यासाठी नदीतील हजारो मासे पाण्यावर तरंगत असल्याचे देखील म्हटले जात आहे.