मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 डिसेंबर 2021 (07:42 IST)

म्हाडाचा पेपर फोडणार्‍या तिघांना अटक; परीक्षा पुढे ढकलल्याने भाजप नेते आक्रमक

three-arrested-for-leaking-mhada-papers-bjp-leader-aggressive-after-postponing-exams
आरोग्य विभागाचे पेपर फोडणार्‍यांवर मोठी कारवाई केल्यानंतर आता पुणे सायबर पोलिसांनी  रविवारी होणार्‍या म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडणार्‍या तिघांना अटक केली आहे. त्यामुळे या व या आठवड्यात होणार्‍या म्हाडाच्या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत़ या संबंधीचे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
 
प्रितेश देशमुख (रा. पुणे), संतोष हरकळे आणि अंकुश हरकळे (रा. बुलढाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रितेश देशमुख हा म्हाडाची परिक्षा घेणार्‍या जी ए सॉफ्टवेअर प्रा. लि. या कंपनीचा अधिकारी असून संतोष व अंकुश हे त्याचे मित्र आहेत. देशमुख याने आपल्या मित्रांच्या मदतीने म्हाडाचा पूर्वपरिक्षेचा पेपर फोडल्याचे सायबर पोलिसांना आढळून आल्याने त्यांनी रात्री उशिरा तिघांना अटक केली आहे.