Widgets Magazine

गुढीपाडव्यासाठी मध्य रेल्वे आठ विशेष रेल्वे गाड्या सोडणार

Last Modified गुरूवार, 23 फेब्रुवारी 2017 (17:12 IST)
गुढीपाडवा आणि जोडून आलेल्या सुट्यांचा विचार करत मध्य रेल्वेतर्फे मुंबई – गोवा – नागपूर आणि पुणे या ठिकाणहून आठ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. 24 ते 28 मार्च या दरम्यान या गाड्या सुटणार असून यामध्ये पुणे – मडगावसाठी तीन विशेष गाड्या समावेश आहे. दरम्यान, सर्व गाड्या आरक्षीत असून 16 फेब्रुवारीपासून तिकिट आरक्षणास सुरुवात झाली आहे.
येत्या 28 मार्च (मंगळवार) रोजी गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्या त्याच्या आधी शनिवार आणि रविवार या जोडून सुट्टया आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने गुढीपाडव्यासाठी आठ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 24 ते 28 मार्च या दरम्यान या विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे. या विशेष गाड्यांमध्ये पुणे – मडगावसाठी तीन गाड्यांचा समावेश आहे. या मध्ये 24 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी पुण्याहून मडगावकडे विशेष गाडी प्रस्थान करणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता मडगावला पोहचणार आहे. दुसरी गाडी 27 मार्चला सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी तर तिसरी गाडी 28 मार्चला रात्री आठ वाजता पुण्याहून मडगावकडे प्रस्थान करणार आहे. या तिनही गाड्या लोणावळा, पनवेल, रोहा, खेड, चिपळून, रत्नागिरी, कनकवली, कुडाळ आणि थिविम येथे थांबे घेणार आहे.
मुंबई – नागपूर- मुंबई ही विशेष गाडी 28 मार्चला रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी मुंबईहून नागपूरला प्रस्थान करणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिर रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे थांबे घेणार आहे.

नागपूर – मडगाव विशेष गाडी 25 मार्चला दुपारी चार वाजता नागपूरहून प्रस्थान करणार आहे. ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, थिविम येथे थांबे घेणार आहे. मडगाव – मुंबई विशेष गाडी 26 मार्च रोजी रात्री आठ वाजता मडगावहून मुंबईकडे प्रश्‍थान करेल. ही गाडी थिविम, कुडाला, कनकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, ठाणे, दादर येथे थांबे घेणार आहे. मुंबई – नागपूर – मुंबई ही विशेष गाडी 28 मार्च रोजी रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी वाजता मुंबईहून नागपूरकडे प्रस्थान करणार आहे. ही गाडी 28मार्चला दुपारी तीन वाजता नागपूरला पोहचणार आहे. त्यानंतर, नागपूरहून संध्याकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी मुंबईकडे प्रस्थान करणार आहे. या गाड्या दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा येथे थांबे घेणार आहे. मडगाव – नागपूर विशेष गाडी 25 मार्च रोजी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी नागपूरकडे प्रस्थान करणार आहे. तर, नागपूर – पुणे ही विशेष गाडी 26 मार्च रोजी सकाळी दहा वाजता नागपूरहून पुण्याला प्रस्थान करणार आहे.
उन्हाळी सुट्टयांचे नियोजन सुरु…!
गुढीपाडवा आणि त्याला जोडून आलेल्या सुट्टया याचा विचार करता प्रवाशांना दर्जेदार सेवा आणि सुविधा देण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे, त्यानुसार या गाड्यांसह अन्य ठिकाणीही जादा गाड्या सोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असून प्रशासनाच्या वतीने त्याबाबतचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. त्याशिवाय उन्हाळी सुट्टयांच्या काळातही प्रशासनाच्या वतीने विविध मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत, त्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने नियोजन सुरु करण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :