शनिवार, 18 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 15 डिसेंबर 2024 (16:35 IST)

जालना येथे ट्रक आणि बसची भीषण धडक, 4 जण जागीच ठार

महाराष्ट्रातील जालना येथे शनिवारी झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. नवा रोड परिसरात दुपारी चारच्या सुमारास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसची आणि ट्रकची धड़क होऊन हा अपघात झाला 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस मालेगावहून माहूरगडला जात होती आणि त्यात सुमारे 60 प्रवासी होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रकने बसला धडक दिली. 

अपघाताची माहिती मिळाल्यावर स्थानिकांनी घटनास्थली पोहोचन त्यानी बचावकार्य सुरु केले.सर्व जखमींना जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रकचालक दारूच्या नशेत असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला. पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली असली तरी त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 
Edited By - Priya Dixit