रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (07:48 IST)

आमदार अनिल भोसले यांच्या मालकीच्या दोन अलिशान कार जप्त

शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्या मालकीच्या दोन अलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबतची  माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
 
शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक गैर व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह १६ जणांविरोधात १३५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, आमदार अनिल भोसले हे अटकेत आहे.
 
या पार्श्‍वभूमीवर आता आर्थिक गुन्हे शाखे मार्फत अनिल भोसले यांच्या दोन कार तीन दिवसांपूर्वी जप्त केल्या आहेत. तर आता भोसले यांची आणखी मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. लवकरच कारवाई केली जाणार असल्याची माहिती संभाजी कदम यांनी दिली.