गुरूवार, 30 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (09:39 IST)

केडीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांना बांधकाम प्रकरणी 15 हजाराची लाच घेताना अटक

Two KDMC officials
केडीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांना बांधकाम प्रकरणी 15 हजार रुपयांची लाच घेताना ठाणे एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. यामध्ये प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि त्यांचे सहकारी सुहास मढवी यांचा समावेश आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील ठाणकर पाडा परिसरात राहणाऱ्या एका सर्वसामान्य नागरिकाचे घराचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या सर्व सामान्य नागरिकाकडे 20 हजार रुपायांची मागणी केली. त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला. अखेर 15 हजार रुपये देण्याचे ठरले. हेच पंधरा हजार 
घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रभाग अधिकारी कार्यालयात दोघांना रंगेहाथ पकडले.