शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 6 मे 2024 (11:55 IST)

१२० फूट उंचीवरून दोन तरुणांनी धबधब्यात उडी घेतली, एकाचा मृत्यू; व्हिडिओ

India
महाराष्ट्रातील पालघर मध्ये एक दुःखद घटना घडली आहे. पालघर मधील जव्हार परिसरात प्रसिद्ध दाभोसा धबधब्यात बुडाल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही तरुण धबधब्याजवळ अंघोळ करण्यासाठी गेलेत. या दरम्यान दोन तरुणांनी १२० फूट उंचीवर चढले व इथून त्यांनी थेट पाण्यात उडी घेतली. याचा व्हिडीओ त्यांच्या मित्रांनी फोन मध्ये रेकॉर्ड केला. 
 
धबधब्यात उडी मारलेल्या तरुणाचे नाव आहे माज शेख आणि जोएब आहे. माज शेख ज्याचे वय २४ आहे. उडी मारल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. तर जोएब गंभीररित्या जखमी झाला आहे. तसेच रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांच्या मते, दाभोसा सरोवर फिरण्यासाठी मुंबई मधून मीरा रोडच्या कशिमीरी येथील 3 युवक आले होते तिघे मित्र होते. दोन तरुणांचा धबधब्यात उडी मारतांनाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही तरुणांनी कसा तरी माझ शेखला वाचवले आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचवले, मात्र त्याचा मृत्यू झाला. जोएबची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला दाखल केले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून शरीराचे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाची पोलिस चौकशी करत आहेत. मृतांच्या नातेवाईकांचे जबाबही घेण्यात आले आहेत. याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे.

Edited By- Dhanashri Naik