उध्दव ठाकरे यांची मालेगावात सभा  
					
										
                                       
                  
                  				  नाशिक :मालेगाव मध्ये माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भव्य जाहीर सभा रविवारी होणार आहे. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून शहराच्या मुस्लिमबहुल पूर्व भागात उर्दू भाषेत ठिकठिकाणी होर्डिंग लावण्यात आले आहे,
				  													
						
																							
									  
	 
	ठाकरे यांची साथ सोडून पालकमंत्री दादा भुसे हे शिंदे गटात गेल्यानंतर मालेगावमध्ये ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन या निमित्ताने केले जात आहे. या सभेसाठी गेले काही दिवस शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी बैठका घेऊन नियोजन केले आहे. मालेगावमध्ये भाजप सोडून अव्दैय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी सुध्दा ही सभा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. सभेला एक लाख नागरिक उपस्थित असण्याची शक्यता संजय राऊत यांनी वर्तवली आहे. सभेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे शिवसेनेत फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकला येत आहे. 
	Edited by : Ratnadeep Ranshoor