Widgets Magazine
Widgets Magazine

सामनाची मुंबई कुलगुरूंवर झहरी टीका, निकालांचे श्राद्ध - उद्धव ठाकरे

मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (11:46 IST)

uddhav thakare

ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतल्यामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याच्या परीक्षेत नापास झाले आहेत. यावरुन सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर जबरदस्त टीका केली आहे. वाचा सामना ने काय टीका केली आहे ती

मुंबई विद्यापीठाचे वैभवशाली टॉवर झडताना व पडताना दिसत आहेज्या विद्यापीठाने अनेक पिढय़ा घडवल्या ते विद्यापीठ परीक्षा व निकालांचे श्राद्ध घालताना दिसत आहेसंघविचाराचे आहेत म्हणून कुलगुरूंना माफी नाहीत्यांना जावेच लागेलकुलगुरूंची वकिली करणाऱ्यांच्या जिव्हा झडून जातील व लाखो विद्यार्थ्यांचे तळतळाट त्यांना लागतीलमुंबई विद्यापीठातील अनागोंदीमुळे चार लाख विद्यार्थ्यांच्या जीवनात जे खड्डे’ पडले आहेत त्यावरही कुणी तरी आता ‘‘मुंबईतुझा विद्यापीठावर भरवसा नाही काय!’’ असे गाणे वाजवायला हरकत नाही!

अनागोंदीची जबाबदारी
शिक्षण मंत्री तसेच विद्यापीठाच्या कुलगुरूंवर तर जातेच, पण इतका बेफिकीर, अकार्यक्षम कुलगुरू नेमणाऱ्या सरकारवरदेखील जाते. नव्या राजवटीत कुलगुरू निवडीचा घोटाळा झाला आहे व तो गंभीर आहे. राज्यपालांच्या नेमणुका या संघविचारक आणि प्रचारकांच्याच झाल्या आहेत. देशात प्रथमच संघविचारक व प्रचारक हे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान बनले आहेत, पण निदान पिढी घडवणाऱ्या शैक्षणिक संस्था तरी त्यातून सुटाव्यात व ‘मेरिट’वर या नियुक्त्या व्हाव्यात. संघविचार हा गुन्हा नाही व त्या विचाराने कुणाचे नुकसान होणार नाही. आम्ही तर सरसंघचालकांचेच नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे केले होते, पण सध्या मुंबई विद्यापीठाची जी घसरण सुरू आहे ती पाहता सरसंघचालक कुलगुरूंना व त्यांना नेमणाऱ्यांना काठीने फोडून काढतील असे चित्र आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कुलगुरूंच्या राजीनाम्यासाठी बोंब मारो आंदोलन

आज मुंबई विद्यापीठाच्या परिसरात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल ...

news

बिहार नंतर आता AIADMK एनडीएमध्ये सहभाग नोंदवणार

बिहार यांना भाजपाने सोबत घेतले आहे. आता दक्षिण भारतातील जयललिता यांचा पक्ष AIADMK ...

news

आपल्या सैनिकांचे यश : लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर अबु दुजानाचा खात्मा

पुन्हा एकदा आपल्या सैनिकांनी आपली ताकत सिद्ध केली आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीदरम्यान

news

नवाझ शरीफ यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड आज

पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ शरीफ गट)चे नेते शाहिद खकान अब्बासी यांची पंतप्रधान पदासाठी ...

Widgets Magazine