शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (09:03 IST)

प्रत्यक्षात कर्जमुक्ती झालेली नाही : उद्धव ठाकरे

हेवेदावे विसरुन कामाला लागा असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना दिले आहेत. राज्यात कर्जमुक्तीचे वातावरण घोंगावत असून प्रत्यक्षात कर्जमुक्ती झालेली नाही. कर्जमुक्ती ही सत्यावर आधारित असावी असे मत त्यांनी मांडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. 

शिवसेना पक्षात मतभेद नाही. हेवेदावे विसरुन सर्वांनी कामाला लागावे असे निर्देश त्यांनी दिले. सोबतच जे अंगावर येतील, त्यांना शिंगावर घेणार असेही त्यांनी म्हटले आहे.

यावेळी सत्ताधारी भाजपवरही उद्धव ठाकरेंनी टीका केली. कर्जमुक्तीवर ठाकरे म्हणाले, राज्यात कर्जमुक्तीचे वातावरण घोंगावत असून प्रत्यक्ष कर्जमुक्ती झाली नाही. राज्यात कर्जमुक्ती सत्याला धरुन करावी. कर्जमाफीचा लाभ ८९ लाख शेतकऱ्यांना मिळणार. तर ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण ही आकडेवारी त्यांनी सभागृहात द्यावी. कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव आणि पत्ते विधीमंडळाच्या सभागृहात सादर करावे असे त्यांनी सांगितले.