उजनी धरणातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या सिंचन योजनेसाठी पाच टीएमसी पाणी मिळाणार  
					
										
                                       
                  
                  				  सोलापूरच्या उजनी धरणातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या सिंचन योजनेसाठी पाच टीएमसी पाणी मिळाणार नाही. याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. उजनी धरणातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या सिंचन योजनेसाठी पाच टीएमसी पाणी देण्यास मंजुरी मिळाली होती. मात्र, याला सोलापूरकरांसह जिल्ह्यातील सर्व पक्षांनी विरोध दर्शवला. अखेर शासनाने इंदापूरला पाच टीएमसी पाणी द्यायचे नाही, अशा आदेशाचे पत्र अखेर काढले. जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजिनाथ चिल्ले यांची या पत्रावर स्वाक्षरी आहे.
				  													
						
																							
									  
	 
	उजनी धरणातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या सिंचन योजनेसाठी पाच टीएमसी पाणी मंजुरी मिळाली होती. या मुद्द्याला जनहित शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, तसेच भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी तीव्र विरोध केला.
				  				  
	 
	आमदार संजय शिंदे हे मुंबईत होते. त्यांनी अखेर पाच टीएमसी पाणी न देण्याचे शासनाचे ते पत्र आपल्याकडे घेतलेच.