1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (08:17 IST)

उमेद संस्थेचे कर्मचारी राज ठाकरे यांच्या भेटीला

Umed Sanstha
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे उमेद संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांनी उमेद संस्थेविषयी राज्य सरकारच्या खासगीरकरणाच्या धोरणाबद्दल समस्या मांडल्या. राज ठाकरेंनी यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली. 
 
केंद्र सरकारचे जीवनोन्नती अभियान महाराष्ट्रात उमेद संस्थेतर्फे राबवले जाते. उमेद संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेत “खासगी संस्थेकडे वर्ग करण्याचा घाट राज्य सरकारकडून घातला जात असल्याचे सांगितले”. उमेद संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधत चर्चा केली.
 
राज्यात ४ लाख ७९ हजार १७४ समूह स्थापन करण्यात आले असून यामध्ये ४९ लाख ४४ हजार ६५६ कुटुंब या कर्मचाऱ्यांनी जोडलेली आहेत. मात्र, कोणतेही पूर्व सूचना न देता अचानक अनेक जिल्ह्यातील वेगवेगळ्या पदावर कार्यरत कर्मचारी यांच्या सेवा शासनाने अन्यायकारक पद्धतीने समाप्त केल्या गेल्याने अभियानाचे खासगीकरण होत असल्याचा आरोप झाला होता.