गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 19 सप्टेंबर 2021 (17:40 IST)

दुर्देवी ! ड्रायव्हिंग शिकताना झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू

Unfortunate! All four died in an accident while learning to drive Marathi News Regional Marathi News In Marathi Webdunia Marathi
कार ड्रायव्हिंग शिकण्यासाठी गेलेल्या चौघांचा अपघातात मृत्यू झाला आहे ही घटना जयपूर येथील रावतसर येथे घडली आहे.पहाटेच्या सुमारास कार ड्रायव्हिंग शिकण्यासाठी तीन भाऊ आपल्या मित्रासह गेले होते.हायवेवर एका ट्रेलरने कारला जोरदार धडक दिली त्यात कार चक्काचूर झाली आणि त्यात बसलेले तिघे भाऊ आणि त्यांच्या मित्राचा दुर्देवी अंत झाला.नीरज,हेमंत,रजत हे तिघे भाऊ होते.तर रुद्राक्ष त्यांचा मित्र होता. 
 
पहाटेच्या सुमारास वाहतूक कमी असते या मुळे हे पहाटे कार चालवायला शिकण्यासाठी निघाले.त्यांनी आपल्या घराच्या जवळ राहणाऱ्या आपल्या मित्रा रुद्राक्षला देखील सोबत घेतले. रजत ला थोडेफार ड्रायव्हिंग येत होते.पण बाकी शिकत होते.सगळ्यांनी एक एकदा कार चालवली.घरी परत येताना रजत कार चालवत होता.घरी परतताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रेलरशी कारची जोरदार धडक झाली.
 
ही धडक जोरदार होती की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.आणि या मध्ये बसलेले चौघे जण मरण पावले. स्थानिकांच्या मदतीने या चौघांना रुग्णालयात नेण्यात आले.त्यापूर्वीच ते मरण पावले होते.त्यांच्या अशा आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांची वाईट अवस्था आहे.एकाच घरातील तिघे तरुण मुलं गमावल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.