मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 सप्टेंबर 2021 (14:49 IST)

दुर्देवी! नाशिकमध्ये महिलेवर बलात्कार

Unfortunate! Rape of a woman in Nashik  Maharashtra News Regional Marathi News  In Marathi Webdunia marathi
नाशिकच्या सिन्नर तालुक्याच्या शहा शिवारात एका महिलेवर दुचाकी अडवून कारमध्ये नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे.ही महिला दुचाकीवरून जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करून महिलेच्या दुचाकीच्या पुढे आपली कार अडवली.हे बघून महिला घाबरली नंतर आरोपीने महिलेला बळजबरीने कारच्या आत नेऊन दार बंद करून जिवे मारण्याची भीतीदेत तिच्यावर अतिप्रसंग केला.सदरआरोपीने आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे फोटो देखील काढले.
 
महिलेने प्रतिकार करत आरडाओरडा देखील केला.पण आरोपीने जीवे करण्याची धमकी देत बलात्कार केला.या घटनेची कुठेही वाच्यता केल्यावर हे फोटो सोशल मीडियावर सामायिक करण्याची धमकी महिलेला दिली.महिलेने वावी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल करून कलम 376 ,341,506 च्या अंतर्गत आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.