सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (09:45 IST)

जळगावात वाहनांची तोडफोड ; आरक्षण आंदोलन पेटले

marathi andolan
जळगाव : जळगावमध्ये आरक्षण आंदोलन पेटले आहे. जळगावातील पहूर येथे आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करणा-या संतप्त जमावांनी वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली आहे. मिळेल त्या वाहनांची तोडफोड करण्यात येत असल्याने आंदोलन चिघळले आहे. आरक्षणातील घुसखोरी थांबविण्यासाठी विमुक्त जाती अ प्रवर्गातील समाजबांधवांनी जळगावच्या पहूर येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले आहेत. या सर्वांनी रास्ता रोको केल्याने वाहतूक कोंडीही झाली आहे.
 
गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि सकल विमुक्त जातीच्या सर्व संघटनांनी हे आंदोलन छेडले आहे. विमुक्त जातीचे खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणा-या आणि देणा-यांवर कारवाईसह विविध मागण्यांसाठी विमुक्त जाती प्रवर्गातील समाजबांधव आक्रमक झाले आहेत. या आंदोलकांनी रस्त्यावर येऊन घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. तर काही आंदोलकांनी थेट वाहनांनाच लक्ष्य केल्याने खळबळ उडाली आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor