1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे ला निवडणूक

maharashtra news
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. तशी घोषणा  केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. यात नाशिक, कोकण, अमरावती, परभणी-हिंगोली, तसंच उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्थाचा समावेश आहे. 
 
या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यात भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांवर अधिक प्रतिनिधी कसे निवडून येतील, यावर भर देताना दिसत आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.  स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातल्या उमेदवारांसाठी ही निवडणूक होत आहे. नाशिक, कोकण, अमरावती, परभणी-हिंगोली, तसंच उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे. यातील पहिल्या तीन जागा राष्ट्रवादीच्या, चौथी जागा काँग्रेस आणि शेवटच्या दोन जागा भाजपच्या ताब्यात आहेत.