testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

विधानपरिषदेसाठी आज पोटनिवडणूक

mumbai vidhan parishad
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागेसाठी गुरुवार पोटनिवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर तसंच येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर
सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची आणि आमदारांची बैठक होणार आहे.

याआधी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी नारायण राणेंना भाजपकडून उमेदवारी मिळणार यावर मोठी चर्चा रंगली होती. मात्र, शिवसेनेचा टोकाचा विरोध लक्षात घेता भाजपने प्रसाद लाड यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. त्यानंतर लागलीच काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने यांना रिंगणात पुढे करण्यात आलं. या पोटनिवडणुकीची आजच मतमोजणी होणार आहे.


यावर अधिक वाचा :